Ticker

6/recent/ticker-posts

लक्ष्मण हुसे यांचे निधन--ज्येष्ठ पत्रकार सुरेश हुसे यांना पितृशोक !



सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे 

सिंदखेडराजा : दैनिक दिव्य मातृछाया' चे तालुका प्रतिनिधी सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी व जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार सुरेश हुसे यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडिल लक्ष्मण ग्यानुजी हुसे यांचे वयाच्या ७२व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या राहत्या गावी निमगाव वायाळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने लक्ष्मण हुसे यांचे निधन झाल्यानंतर चोहीकडे हळहळ व्यक्त होत होती. दुपारी चार वाजेच्या सुमारास निमगाव वायाळ येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले

लक्ष्मण ग्यानुजी हुसे यांचे वयोमानाने अल्पशा आजाराने अचानक निधन झाल्याने हुसे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा अनेक सामाजिक कार्यात सहभाग असायचा. तसेच, अनेकांच्या अडीअडचणीला ते धावून जात असतं. दिव्य मातृछाया सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी सुरेश हुसे व गणेश हुसे यांचे ते वडिल होतं.