बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
अंभेरी (ता.खटाव) येथील शिवधाम मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.परिसरातील साधकांनी महाशिवरात्री निमित्ताने अगदी पहाटे पासून ते रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मठाधिपती आचार्य शिवानंद भारती यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील पंचक्रोशीत आराध्यदैवत म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवधाम मंदिरात एमएमआरडीए निवृत्त कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे यांच्या हस्ते पहाटे विधिवत पूजा झाल्यावर खटाव पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी रांगा लागल्या. दुपारच्या सत्रात फलाहार झाल्यावर सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप संदीप मांडके यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. त्यांना तबला वादक विश्वनाथ पुरोहित, संवादिनी बाळासाहेब चव्हाण, ज्ञानेश्वर गुरव, प्रकाश गुरव, श्रीराम कुलकर्णी यांनी साथ दिली. रात्री एक वाजेपर्यंत मीरा भाईंदर महानगरपालिका कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांच्या हस्ते मंत्रोच्चारात शिवपूजन व अभिषेक पूजा संपन्न झाली।.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश नवतरुण मित्रमंडळ व शिवधाम मठाच्या साधकांनी परिश्रम घेतले.
.jpg)




Social Plugin