Ticker

6/recent/ticker-posts

स्व.पी.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजपाल बनसोड तर उपाध्यक्ष पदी सदानंद जाधव



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस

 दिग्रस : ग्रामीण पत्रकारांच्या हक्काचं आणि ग्रामीण पत्रकारांना सामाजिक काम करीत असताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो ही जाण लक्षात ठेवून स्वर्गीय पी एल शिरसाट यांनी ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना तीस वर्षांपूर्वी करून ग्रामीण पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासनासोबत लढा उभारून ग्रामीण पत्रकारांना शासनाकडून कशी मदत होईल याकरिता संघाची स्थापना करून ग्रामीण संघटनेचे प्रणेते म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण पत्रकारांचे संघटन उभारले होते ती चळवळ अविरत दिग्रस येथील पत्रकारांनी कायम ठेवत समाजासमोर एक आदर्श निर्माण करीत या संघाच्या माध्यमातून ज्योत कायम तेवत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरवर्षी संघटनेतील प्रत्येक सदस्याला अध्यक्ष पद मिळावे हा उदात्त हेतू या संघटनेचा असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संघटनेची कार्यकर्त्यांनी गठित झाली यामध्ये राजपाल बनसोड संघटनेचे अध्यक्षपदी तर सदानंद जाधव उपाध्यक्षपदी तर सुनील साबळे सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.यावेळी विलास निकम, प्रफुल्ल व्यवहारे, ज्ञानराज ढोरे,अक्षय काळबांडे, साजिद पतलेवाले,यादव गावंडे रामदास मांगूळकर उपस्थित होते.