Ticker

6/recent/ticker-posts

तिडके पा.विद्यालयात स्मार्ट इंटरॲक्टिव्ह डिजिटल पॅनल बोर्डचे उद्घाटन



पत्रकार:- मोहन जाधव

चास नळी:-

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण गोडी वाढावी व त्यांना तंत्रशुद्ध व डिजिटल शिक्षण मिळावे. शिकविणारे व शिकणाऱ्यांसाठी अत्याधुनिक साधनांमधील अमुलाग्र बदल स्वीकारणे आवश्यक आहे. वर्गातील फळा व खडू कालबाह्य होत चालला आहे. माहिती व तंत्रज्ञानातील वेगवान बदलामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण स्मार्ट बनले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब यांच्या संकल्पनेतून प्रत्येक शाळेमध्ये फळा व खडूच्या जागी इंटर ऍक्टिव्ह बोर्ड बसविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात ११ स्मार्ट इंटर ऍक्टिव्ह बोर्ड व प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले याचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे सल्लागार समितीचे सदस्य सोमनाथ चांदगुडे स्थानीक स्कूल कमिटी सदस्य सचिन चांदगुडे, महेश गाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक जामदार व्ही. एन. देविदास कासोदे, विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए.आर.पर्यवेक्षक चंदने पी.आर. यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.