ग्रामीण प्रतिनिधी-निखिल नलवडे-
दुधगांव येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे रविवार दि. २३ रोक पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाच्या मुहूर्तमेढ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमासाठी सर्व श्रावक-श्राविका आणि वीर महिला मंडळ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळ ७ वाजता मिरवणुकीने होईल. मिरवणुकोचा मार्ग कर्मवीर पुतळा- चावडी चौक - जैन मंदिर असा राहणार आहे. यानंतर सकाळी ८ वाजता मंदिरात पंचामृत अभिषेक पूजा तसेच माता पद्मावती देवी ओटी भरणी होणार आहे. यासाठी सर्व श्रावक श्राविकानी पुजेचे साहित्य आणि देवीच्या ओटीचे साहित्य सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पूजेनंतर मंदिरासमोर मुहूर्तमेड कार्यक्रम होईल आणि त्यानतर पंचकल्याणक पूजेच्या जागी मुहूर्तमेढ विधी संपन्न होईल यानंतर सौधर्म इंद आणि इंद्रायणी यांच्या निवासस्थानी देखील मुहूर्तमेढ कार्यक्रम पार पडेल. सर्व श्रावक श्राविकानी ठरलेल्या वेळेत गारवा घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. यामध्ये ना गरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाला भव्य स्वरूप द्यावे असे आवाहन पूजा कमिटीकडून करण्यात आले आहे.





Social Plugin