बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
विसापूर ता . खटाव येथील जिल्हा परिषद मधील इ.५ वी मध्ये शिकणारा वेद प्रविण गोसावी याची पी. एम. श्री. नवोदय विद्यालय सातारा येथे निवड झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये भारत सरकारच्या नवोदय विद्यालय समितीमार्फत प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. सातारा जिल्ह्यातील ८० विद्यार्थी येथे निवडले जातात. विसापूर शाळेचा प्रथम नवोदय पात्र विद्यार्थी होण्याचा बहुमान वेदने मिळवला आहे त्याबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. वेदचे वडील दिवंगत प्रविण गोसावी आणि आणि आई पुष्पा गोसावी या प्राथमिक शिक्षिका आहेत. वेदच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, शिक्षण विस्ताराधिकारी संगिता गायकवाड, चंद्रकांत सुतार, केंद्रप्रमुख बापूराव कुचेकर, सरपंच निलम जगताप, उपसरपंच राजेश ढोले, व्यवस्थापन समिती अध्यक्षा शितल साळुंखे, उपाध्यक्ष सुशांत साळुंखे, मुख्याध्यापिका लतिका कर्पे, शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
वर्गशिक्षिका स्मिता शेळके, ज्ञानेश्वर धायगुडे, वैशाली नांदे, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव रेश्मा बोडरे यांचे मार्गदर्शन लाभले.





Social Plugin