Ticker

6/recent/ticker-posts

मेडशी येथे शिव महापुराण कथा समाप्ती व महाप्रसादाचे आयोजन



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

 मेडशी : हिंदू महापुराण हे पारंपारिकपणे व्यासांना दिले जातात,परंतु अनेक विद्वानांनी त्यांना शतकानुशतके अनेक लेखकांचे काम मानले आहे.शिव पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे.ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत.ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे.हे शिवाचे संपूर्णत्व प्रकट करेल आणि तुम्हाला अधिक धार्मिक बनवेल. तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा मिळेल आणि यामुळे पापांपासून मुक्तता मिळेल आणि तुम्हाला जीवनात अधिक सकारात्मकता येईल.जो कोणी भक्तीने एकदा वाचन करतो तो पापरहित होतो. 

अशा महान महाशिवपुराण ग्रंथाचे वाचन माऊली महावैष्णव बाबुजी महाराज समाधी स्थान विठ्ठल मंदिर (टेकडी) मेडशी येथे ह भ प बाळकृष्ण महाराज शास्त्री यांनी सात दिवस केले.शिव महापुराण कथेचं हे मेडशी मधिल आज पर्यंतच पहिलंच आयोजन असल्यामुळे गावातील तसेच परिसरातील नागरिकांची येथे आठवडाभर गर्दी होती. त्यामुळे गावातील वातावरण भक्तीमय झाले होते.या कथेचे प्रारंभ 22 मार्च रोजी झाला होता.तर समाप्ती ही 27 मार्च रोजी झाली.वाचक वक्ते वृंदावनात शिक्षण झालेले व हरिद्वार, सुकतिर्थ, पंढरपुर अशा मोठमोठ्या ठिकाणी शिवपुराण कार्यक्रम केलेले श्री ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शास्त्री यांच्या अमृत वाणीतुन सर्वांनी ही कथा श्रवण केली. येथे आठवडाभर दररोज अन्नदात्यानी अन्नदान केले असून ह्याचे कार्य संघटक व व्यवस्थापक ह भ प माणिकराव श्यामराव घुगे होते.तसेच मेडशी,मुंगळा, कोळदरा, उंबरवाडी, वाकळवाडी, हनुमानवाडी येथील भाविकांनी येत आठवडाभर सेवा देत सहकार्य केलं विशेष म्हणजे सेवा देणाऱ्यांमध्ये स्वयं स्पुर्तीने सेवा देणाऱ्या महिलांची संख्या ही जास्त होती.