Ticker

6/recent/ticker-posts

उरूस मधील महत्त्वाचा मानाचा झेंडा व पालखी सोहळा

छायाचित्र -: खातगुण येथील राजे बागसवार यांच्या उरूसातील मानाचा झेंडा व पालखी सोहळ्याला दर्शनासाठी भाविकांची गर्दी. छाया - प्रकाश राजेघाटगे


 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

  खातगुण तालुका खटाव येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पिरसहेब राजे बागसवार यांचा दिनांक २२ पासून सुरू असलेल्या उरूस मधील महत्त्वाचा मानाचा झेंडा व पालखी सोहळा दिनांक २५ रोजी हजारो भाविकांचे उपस्थितीत संपन्न झाला. 

      दिनांक २५ रोजी दर्गा परिसरात झेंडा व पालखी सोहळ्याचे पूजन पारंपरिक पद्धतीने प्रवीण बाबसो लावंड, सलीम मलंग कलाल, सोमनाथ राजू धायगुडे यांचे हस्ते करण्यात आले.या यावेळी दर्गा परिसर मलंग बाबांच्या जयघोषाने फुलून गेला होता. 

        दर्गा परिसरात झेंडा व पालखी चे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. झेंडा प्रस्थानाच्या वेळी झेंड्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी दिसून येत होते. 

       यात्रा काळात भाविकां ना सर्व सोयी सुविधा तसेच भाविकांना भरपूर पाणीपुरवठ्याचे व्यवस्था करण्यात आली होती. सर्व भाविकांना सुविधा व्यवस्थित मिळाव्यात याकरिता खातगुण ग्रामपंचायतचे वतीने अतिशय नियोजनबद्ध असे नियोजन केले होते. तसेच यात्रेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्षही ठेवण्यात आले होते.तर पुसेगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नी संदीप पोमन यांचे मार्गदर्शनाखाली यात्रा स्थळापासून ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भानुदास लावंड संपत लावंड, रमेश लावंड यांचे सह सरपंच आमिना सय्यद, उपसरपंच आनंदराव लावंड, यात्रा कमिटी चेअरमन काजल जाधव , व्हा. चेअरमन शिवाजी लावंड,ग्रामविकास अधिकारी रमेश होवाळ, तसेच श्री पिर साहेब देवस्थान कमिटी व समस्त ग्रामस्थ खात गुण यांनी मोलाचे सहकार्य केले.