बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
उंबरमळे (ता. खटाव) येथील पंचायत समितीचे माजी सदस्य अर्जुन दादा वलेकर यांच्या पत्नी यशोदा अर्जुन वलेकर (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,तीन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. त्या वडूज मार्केट कमिटीचे माजी सभापती अण्णा वलेकर व उंबरमळे ग्रामपंचायतीचे सरपंच नवनाथ वलेकर यांच्या आई होत. सावडणे विधी रविवारी (ता.१६ ) सकाळी उंबरमळे येथे होणार आहे.





Social Plugin