अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड : दि 26 मार्च 2025 रोजी अंबड टाका येथे एक दिवशीय आरोग्य शिबिर यशस्वी पणे संपन्न. ज्या मध्ये विविध आरोग्य तपासणी आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला ग्रामपंचायत टाका व , आ. प्रा. कें .वडीगोदी अंतर्गत उपकेंद्र टाका यांच्या सयुक्त विद्यमाने एक दिवस गावकऱ्यांना सोबत( ग्राम दरबारी) उपक्रम यामध्ये गावातील नागरिकांना आरोग्य तपासणी केली. यामध्ये वयोवृध्द लोकांसाठी स्वातंत्र्य तपासणी आयोजित केली होती. गरोदर मातेच्या आरोग्य तपासणी व रक्त तपासणी. माता व बालकाचे लसीकरण रक्तदाब तपासणी. नेत्र तपासणी .मौखिक आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात च्या माध्यमातून ग्रामस्थांना आजाराबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले.
ग्रामस्थांनी विविध आजारात मधील काळजी कशी घ्यावा या याचे मार्गदर्शन करण्यात आली व वैद्यकीय स्वच्छता व स्वच्छ पाणी पिण्याचे ग्रामस्थांना सांगण्यात आले .जास्त उन्हामध्ये काम न करण्याचा उष्णता बाबत आरोग्य शिक्षण दिले. सदरील कार्यक्रमात गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते सदरील कार्यक्रमात मा. सरपंच श्री रामेश्वर वैद्य तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. डॉ. अनिल वाघमारे पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री बनाटे बापू. ग्रामसेवक श्री जी बी हुसे. डॉ लाहोटी. आरोग्य पर्यवेक्षक सी चाळक आरोग्य सहाय्यक श्री अहिरे सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ उगले .आरोग्य सहाय्यक श्री निकम. श्री जरारे आरोग्य सेविका श्रीमती पठाण. आरोग्य सेविका मस्के .श्री शिरसाट. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला ज्यामुळे आरोग्याप्रती जनजागृती वाढली





Social Plugin