.
गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
गोर - बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दरवर्षी चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरते. जगदंबा देवी, संतशिरोमणी सेवालाल महाराज, सती सामका याडी, जेताभाया, श्री. हामुलाल महाराज, डॉ. संत रामराव महाराज, बामणलाल महाराज आदी देवी देवता, संत - महात्मा यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, नवस फेडण्यासाठी भारतभरातून गोर बंजारा बांधव लाखोंच्या संख्येने मोठ्या भक्तिभावाने पोहरादेवी येथे येत असतात. विशेषतः कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा व महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांतून या उत्सवासाठी श्रीक्षेत्र पोहरादेवीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
या यात्रेचे औचित्य साधून गोर बंजारा धर्मपीठाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षी पोहरागड येथे संपन्न होणाऱ्या गोर बंजारा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी पुणे येथील प्रा. डॉ . सुभाष राठोड यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. सुभाष राठोड यांच्या नावाची अधिकृत घोषणा धर्मनेता भगवंत सेवक किसनभाऊ राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विलासभाऊ राठोड यांनी केली आहे.





Social Plugin