Ticker

6/recent/ticker-posts

धामणगाव येथे आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकांबाबत जनजागृती मोहीम संपन्न



धामणगाव (प्रतिनिधी):

मा. पोलीस अधीक्षक साहेब, हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे धामणगाव, ता. वसमत येथे Dial 112, Cyber Helpline 1930 आणि Childline 1098 या आपत्कालीन क्रमांकाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

          गावात प्रभातफेरी काढून विद्यार्थी व गावकऱ्यांना या हेल्पलाइन क्रमांकांचे महत्त्व पटवून देण्यात आले. कुरुंदा पोलीस ठाण्याचे बीट जमादार भगीरथ सवंडकर यांनी उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना आणीबाणीच्या प्रसंगी या क्रमांकांचा योग्य वापर कसा करावा, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

          कार्यक्रमाच्या अनुषंगाने गावचे प्रमुख चौक, शाळा परिसर आणि अंगणवाडी केंद्रात नागरिकांच्या माहितीसाठी मार्गदर्शनपर फलक (Posters) लावण्यात आले. सदरील जनजागृती मोहिमेच्या यशस्वितेसाठी पोलिस पाटील गोविंद खुळखुळे यांनी विशेष प्रयत्न केले.

          यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी. के. जाधव, सहशिक्षक पद्मसिंह जाधव, आदेश देशपांडे, राजेंद्र साबळे, अर्चना काळबांडे, अर्चना कदम, अंजली भुसारे, पुष्पा भागवत तसेच गावातील लक्ष्मण हरबळे, शेषराव हरबळे, शंकर बेले, अनिकेत बेले, अंकुश भुतकर, दर्शन बेले आदींची उपस्थिती होती.