बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
मराठी भाषा संवर्धनाच्या निमित्ताने खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शहाजीराजे महाविद्यालयाच्या मराठी विभागाचा शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर यांच्याशी भाषा, साहित्य, संस्कृती संवर्धन आणि संशोधन या सहचर्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार संपन्न झाला असल्याची महिती प्राचार्य प्रोफेसर डॉ जे पी कदम यांनी दिली.
करारपत्रांचे हस्तांतरण शिविम शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव व सचिव डॉ. मांतेश हिरेमठ यांच्यासोबत प्राचार्य डॉ. जितेंद्र कदम व डॉ. लक्ष्मण साठे यांनी केले. यावेळी जेष्ठ लेखक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे उपस्थित होते. करार प्रसंगी डॉ. अरुण शिंदे यांनी स्वागत केले तर डॉ. विलास सुर्वे यांनी आभार मानले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून या भाषेचा स्तर उंचवण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी शिक्षक संघाने दर्जेदार उपक्रम राबवत मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहून घेतले आहे. करारपत्राच्या उद्दिष्टांप्रमाणे खटाव सारख्या ग्रामीण भागात शहाजीराजे महाविद्यालयातील मराठी विभाग भविष्यात सृजनशील व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यावर अधिक भर देईल.--प्रोफेसर प्राचार्य डॉ. जितेंद्र कदम
विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासनासाठी हा सामंजस्य करार उपयुक्त ठरणार असून शिविमबरोबर साहित्य विचारांची देवाण-घेवाण होणार असल्याने भाषा समृद्ध होण्यासाठी याचा निश्चित फायदा होणार आहे.--सहाय्यक प्राध्यापक डॉ. लक्ष्मण साठे, मराठी विभाग





Social Plugin