Ticker

6/recent/ticker-posts

'सेवागिरी' भक्तनिवासचे पंढरपुरात भूमिपूजन



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे] 

 विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या भाविक भक्तांची राहण्याची उत्तम सोय व्हावी. यासाठी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने पंढरपूर येथील स्वःमालकीच्या जागेत अत्याधुनिक सोयी सुविधेसह भक्त निवासाच्या बांधकामाला सुरुवात केली. बुधवारी  इसबावी (पंढरपूर) येथे खुल्या जागेचे भूमिपूजन करून वॉल कंपाउंडचे काम सुरू करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव व मान्यवर उपस्थित होते.