Ticker

6/recent/ticker-posts

सावळी येथील देवकरे कुटुंबाला आर्थिक मदत.

 


 सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी मौजे सावळी व मिनकी येथे केली आर्थिक मदत

बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.                                                                                               

  बिलोली तालुक्यातील मौजे सावळी येथे दिनांक 27 फेब्रुवारी च्या मध्यरात्री शेतकरी राहुल देवकरे वय 30 वर्ष याचा तंबाखू भट्टीमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी घडली.    त्या दुःखद कुटुंबास दिनांक 28 फेब्रुवारी रोजी समाजसेवक तथा सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी तात्काळ भेट देऊन त्या परिवारांचे सांत्वन करीत आर्थिक मदत केली. व त्या कुटुंबातील लहान मुलांचे शालेय शिक्षणाची जबाबदारी स्वीकारले. याबरोबरच मिनीकी येथील पैलवार कुटुंबाचे भेट घेऊन त्यांनाही आर्थिक मदत केले. 

यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते नाशिक येथील प्राध्यापक यशवंत गोसावी यांच्यासह समाजसेवक राजू पाटील शिंपाळकर, माजी उपनगराध्यक्ष शंकररावजी मावलगे, समाजसेवक सय्यद रियाज, डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे, गजानन पाटील पवार तसेच गावातील शंकर सावळीकर, मिनकी येथील सोसायटी चेअरमन शंकरराव बिरादार, शिवानंद स्वामी यांच्यासह देवकरे व पैलवार कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होते.