Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार गणेश पाटील बोथे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर



प्रतिनिधी मंगरूळपिर --संजय भरदुक 

 मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथुन जवळच असलेले गोगरी गाव येथील युवा पत्रकार व लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते व छत्रपती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे यांना महाराष्ट्र राज्याच्या नावलौकिक विकास कार्यासाठी लोक हितासाठी त्यांची तळमळ बघून त्यांची उत्कृष्ट पत्रकारिता व साहित्य व सामाजिक क्षेत्रातील ऊलेखनिय कार्य केल्या बद्दल कला फाउंडेशन दर्यापूर द्वारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे 

या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत दामले, यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे पुरस्कार वितरण मार्च महिन्यात 2025 मध्ये करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे या पुरस्कारामुळे युवा पत्रकार व लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते व छत्रपती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे यांच्या आता पर्यंतच्या यशस्वीतेत आणखी भर पडणार आहे त्यांना आता पर्यंत काव्य रत्न, युवा भुषण, समाज सेवा, साहित्य गौरव, कार्य गौरव समाज रत्न, राजश्री छत्रपती शिवाजी महाराज, इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले असून आणखी एक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे साहित्यिक पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातून गणेश पाटील बोथे यांचे कौतुक केले जात आहे.