Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व चर्चा सत्र.ताज्या शेतमालाची संधी



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

 कृषी विभागाच्या वतीने अन्न व पोषण सुरक्षा अभियान – तृणधान्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम दि. २२ व २३ मार्च २०२५ रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे शेतमाल विक्री व प्रशिक्षण भवन, काटा रोड, वाशिम येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमात शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या विविध शेतमालाचे दालने उपलब्ध राहणार आहेत. यात धान्य, डाळी, फळे व प्रक्रिया केलेले पदार्थ विक्रीसाठी असतील. महिलांनी तयार केलेले पारंपरिक खाद्यपदार्थही ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

विशेष आकर्षण:

दि. २२ मार्च: चिया उत्पादक आणि खरेदीदारांचे संमेलन – चिया बियाण्यांची थेट विक्री व चिया उत्पादनाविषयी मार्गदर्शन.सायंकाळी ५ ते ९: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लोकनृत्य सादरीकरण.दि. २३ मार्च: डाळी, अन्नधान्य, हळद व अन्य शेतमाल विक्री व व्यापारी संवाद.संपूर्ण कार्यक्रमात सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत विविध अन्नधान्य, डाळी, फळे व सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील.शहरातील ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळवून देण्यास मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने केले आहे.