Ticker

6/recent/ticker-posts

मेडशी येथे उमेद महिला प्रभागसंघ चि वार्षिक सर्वसाधारण सभा सपन्न

      


  मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

मेडशी:दिनांक 12मार्च रोजी मेडशी येथे उमेद प्रभागसंघची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्ष. मनीषा ताई घुगे ह्या होत्या यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली उमेद प्रभाग संघ वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून. जि. प.सदस्य.लक्ष्मी ताई तायडे व मेडशीचे युवासरपंच.शेख जमीर शेख गणी भाई. तसेच सामाजिक कार्यकर्त्या( MCRP) प्रियाताई पाठक. हर्षलता ताई घुगे. रेखाताई खंडागळे. हे होते. जि.प.सदस्य. लक्ष्मीताई तायडे. व मेडशी चे सरपंच शेख जमीर शेख गणीभाई यांनी मेडशी येथील बचत गट असो. उमेद महिला प्रभाग संघ यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले. 

त्यानिमित्ताने. जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीताई तायडे. व मेडशी चे सरपंच शेख जमीर शेख गणीभाई यांचा उमेद महिला प्रभाग संघ च्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मेडशी येथील विधवा. अपंग. एकल महिला. अशा महिलांना. प्रियाताई पाठक यांच्या वतीने साडीचोळी च्या वाटप करण्यात आला. यावेळी (DDUGKY )चे जिल्हा समन्वयक.केशव कोरडे.यांनी उमेद अभियान व बेरोजगार मुलाना रोजगार नौकरी च्या संधी बदल सविस्तर मार्गदर्शन केले व तसेच प्रभाग समन्वयक.सदानंद राऊत. यांनी प्रभागाची रूपरेषा प्रस्तावना समूहातील महिलांचे उत्पन्न व उपजीविका वाढविण्याकरिता उमेद अभियान तत्पर आहे यांचे सखोल मार्गदर्शन केले, सउपजीविका व तसेच उमेद अभियानाचे उपजीविका माहिती पुस्तक वाटप करण्यात आले. सदर सभेला प्रभागसंघाचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सर्व ग्राम संघातील पदाधिकारी उपस्थीत होते.

सदर सभेमध्ये प्रभागातील सर्व ग्रामसंघ पदाधिकारी गावातील समूहातील महिला उपस्थीत होत्या सदर कार्यक्रम मध्ये सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच (MCRP) प्रिया ताई पाठक.यांनी उपजीविका वर मार्गदर्शन केले (MCRP) आशाताई तायडे. यांनी सूत्र संचालन केले तसेच पुर्ण अभियानाची रूपरेषा, या संदर्भात मार्गदर्शन केले.

प्रभागसंघ सभेमध्ये अध्यक्ष. व लिपिका यांनी प्रभाग संघ वार्षिक लेखाजोखा व पुढील अर्थिक वर्षाचे करावयाच्या कामाविषयी माहिती दिली. गायन स्पर्धा.संगीत खुर्ची. तळ्यात मळ्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात समूहातील महिलांचे मनोगत व्यक्त केले अशा स्पर्धा घेवून उमेद अभियानाचे सन्मान चिन्ह व बक्षीस वितरण करण्यात आले.उत्कृष व्यवसाय करणाऱ्या व व्यवसायातून विकासाकडे वाटचाल करणाऱ्या महिलांना लखपती दिदिचे प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यातआले. कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडण्या करिता प्रभागातील सर्व (कॅडर ) व मंगला इंगळे,रूपाली तायडे, देशमुख ताई (अंगणवाडी सेविका) व इतर महिलावर्गाने परिश्रम घेतले.