Ticker

6/recent/ticker-posts

उत्कृष्ट युवा मित्र पुरस्काराने प्रदिप पट्टेबहादूर सन्मानित



*"मुंबईच्या युवा संस्थे अंतर्गत अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने अमरावती येथे मान्यवरांच्या हस्ते प्रधान"*

मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

वाशीम ; दि.12, वाशिम येथून जवळ असलेल्या ग्राम केकतउमरा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन प्रदिप पट्टेबहादूर यांना यांना नुकताच युवकांसंदर्भात उत्कृष्ट कार्य कार्य केल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट युवा मित्र पुरस्कार 2025 चा युवा संस्था मुंबई अनुभव शिक्षा केंद्राच्या अमरावती विभाग यांच्या वतीने प्रदान करण्यात आला आहे. मुंबई येथील युवा संस्थेअंतर्गत अनुभव शिक्षा केंद्र यांच्या माध्यमातून महाराष्ट्र मध्ये गेल्या 38 वर्षापासून युवकांसंदर्भात कार्य केले जात आहे. यामध्ये संविधान आधारित मूल्य व नेतृत्व विकास,या विषयावर महाराष्ट्रातील प्रत्येक भागामध्ये युथ फॉर डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट अंतर्गत कार्य केला जात आहे. त्याच अनुसंग 9 मार्च 2025 रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या अनुभव शिक्षा केंद्र युवा संस्थे अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवक युवती यांना *उत्कृष्ट युवा मित्र पुरस्कार* व लेक लाडकी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 

त्याच अनुसंगाने वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागामधून नेतृत्व करणारे युवा सामाजिक कार्यकर्ते अनुभव शिक्षा केंद्र साथी प्रदिप कडूजी पट्टेबहादूर रा. केकतउमरा ता.जि. वाशिम यांना *सन 2025 या वर्षाचा उत्कृष्ट युवा मित्र पुरस्कार* हा उपस्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ.हर्षवर्धन देशमुख, अनुभव शिक्षा केंद्र अमरावती विभागीय समन्वय सुरेश लुले, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी प्रा.शिवाजी तूपेकर,समाजसेविका प्रा.जोत्सना मेहकरे, सामाजिक कार्यकर्ते भाई प्रफुल कुकडे,अनुभव शिक्षक केंद्र अमरावती वाशिम समन्वयक आशिष धोंगडे त्यांच्या हस्ते शाल श्रीफळ भारतीय संविधानाची प्रास्ताविका,मी रमाई पुस्तक, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.


प्रदिप पट्टेबहादूर यांनी मागील अनेक वर्षांपासून अनुभव शिक्षक केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील युवकांना नेतृत्व विकास संविधानिक मूल्य धर्मनिरपेक्षता,सामाजिक न्याय,स्त्री पुरुषसमानता,प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व,श्रमप्रतिष्ठा,पर्यावरण, रोजगार निर्मिती,करिअर गार्डन,व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा,महिला सक्षमीकरण, जल संवर्धन,स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती मुक्ती, या संपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना हा उत्कृष्ट युवा मित्र पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनुभव शिक्षक केंद्राचे बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ इंगोले, मागासवर्गीय वस्तीगृहाच्या गृहपालिका वर्षा लाकडे,जिल्हा परिषद सदस्य चंदू डोईफोडे, अनुभव शिक्षा केंद्र साथी प्रा.डॉ.किशोर वाहणे,दिवाकर देशमुख यांच्या सह साथींनी कौतुक केले.