मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव ; राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमातंर्गत क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदान व क्षयरोगावरील औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. या साठी संशयित क्षयरुग्णाचे रोगनिदान दवाखान्यात करण्यात येते. फुप्फुसाचा क्षयरोग असणारे बरेचसे रुग्ण होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे व त्याबाबत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळले आहे.
वरील वस्तुस्थिती पाहता केंद्रशासनातर्फे अदयापही क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांना गृहभेटीव्दारे शोधून काढण्यासाठी दिनांक १० मार्च २०२५ ते २२ मार्च २०२५ दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राज्यामध्ये व जिल्हयामध्ये राबविण्याचे ठरविलेले आहे. वाशीम जिल्हयामध्ये या मोहिमेची तयारी करण्यात आलेली आाहे.
सदर मोहिमेचे उद्दिष्टय क्षयरोगाचे निदान होण्यापासून अदयापही बंचित असणाऱ्या सर्व क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे आहे. यानुसार सदर मोहीमेमध्ये जोखमीच्या क्षेत्र / ठिकाणी गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधणे. त्यांची धुंकी नमुने तपासणी, आवश्यकतेप्रमाणे एक्स-रे व इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे अपेक्षित आहे. यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमातील कर्मचारी त्यांचे भागधारक अशासकीय संस्था तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग, आशाताई यांची पथके निवडलेल्या भागात घरोघरी संशयित क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करणार आहे. मोहीमेदरम्यान सर्व गरजू व्यक्तींनी संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणाऱ्या भागामध्ये गृहभेटीव्दारे घरातील व्यक्तींशी संवाद साधणे, पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्फलेटस, ऑटोरिक्षा माइकिंग या व्दारे व्यापक प्रसिध्दी प्रसिध्दी करण्यात येत आहे
या विशेष मोहिमेतंर्गत वाशिम जिल्हयातील वंचित घटक उदा. झोपडपट्टी, पोहचण्यासाठी अवघड गावे आणि वस्त्या, कारागृहातील कैदी, ज्या गावात रुग्ण जास्त असू शकतात असे गावे, एचआयव्ही अतिजोखीम गट, असंघटित कामगार, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, बेघर, वृध्दाश्रम अशा निवडलेल्या भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी आशा वर्कर, आंगणवाडी सेविका तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवक हे गृहभेटीब्बारे संशयित क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करणार आहे. गृहभेटी दरम्यान पथक सदस्य निश्चित केलेल्या सर्व घरांना भेटी देऊन घरात असलेल्या सर्व व्यक्तींची क्षयरोग लक्षणांविषयी माहिती घेणार असून क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचा धुंकी नमुना गोळा करुन तपासणी करिता जवळच्या डीएमसीला पाठविणार आहे.
-------------------------------------------
*क्षयरोगाची खालील प्रमाणे लक्षणे असतात.*
➤ दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला असणे
> तसेच दोन आठवडयापेक्षा मुदतीचा ताप असणे
> मागील तीन महिन्यामध्ये वजनात लक्षणीय घट असणे
> मागील सहा महिन्याच्या कालावधीत कधीही धुंकीवाटे रक्त पडत असणे
> मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे,
> यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले असणे
वरिलपैकि कोणतेही लक्षणे असल्यास सदर व्यक्तीने तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. जिल्हयात सर्व आरोग्य संस्थांमध्ये मोफत धुंकी नमुना तपासणी, क्ष-किरण तपासणी व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सीबीनेंट मशीनव्दारे तपासणी व्यवस्था उपलब्ध आहे. निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांना मोफत उपचार सर्व शासकिय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध आहे. क्षयरोग विरोधातल्या या लढयामध्ये सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. व या विशेष मोहिमेव्दारे अद्याप निदान न झालेल्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांचेवर उपचार करण्यात येणार आहे. याकरिता सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश परभनकर यांनी केले आहे.





Social Plugin