यावल प्रतिनिधी रविंद्र आढाळे✒️
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालयाच्या सन २००५/०६च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. मेळाव्यात एकूण ४५ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करून जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन वर्गातील गमतीजमती सह,सुख दुःखाचे प्रसंग सांगितले.बोराळे येथील फुले, शाहू डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका चे संचालक सुपडू संदानशिव यांनी आपल्या या छोट्याशा गावामध्ये गोरगरिबांचे शिक्षण व्हावे यासाठी श्री वासुदेवबाबांनी शाळा सुरू करून आम्हा गावावर व गावकऱ्यांवर उपकार केल्याची भावना बोलून दाखवली तसेच शाळेच्या सुरुवातीपासून तर आतापर्यंत ज्यांचे ज्यांचे योगदान आहे या सर्वांच्या कार्याचे कौतुक करुन या गावात शाळा असल्यामुळे आपण घडलो. नाशिक येथील भाग्यश्री नेवे गावात १९९२ सालापासून शाळा सुरू झाल्यामुळे आमच्यासारख्या मुलींना शिक्षण घेता आल्याची भावना व्यक्त केली.
गावातील प्रगतीशील शेतकरी हीतेंद्र धनगर यांनी श्री वासुदेवबाबा मुळे आपल्या गावाचा व आमच्यासारख्या वंचित घटकाचा शैक्षणिक तसेच सर्व बाबतीत उद्धार झाल्याचे भावना व्यक्त केल्या. वस्तीगृहातील माजी विद्यार्थी कैलास सोनवणे यांनी मी वसतीगृहात राहून शिकलो त्यामुळे आज माझ्या स्वतःच्या पायावर उभा असून चांगल्या कंपनीत नोकरीला आहे व माझा परिवार मी आज सक्षमपणे पुढे नेऊ शकतो, तसेच आज आपल्या गावातील आदिवासी घटक सुद्धा कमी नाही आज या शाळेमुळेच लोहमार्ग पोलीस मध्ये कार्यरत जरीना तडवी, फायरमॅन राजू तडवी आणि वायरमन रसूल तडवी आम्ही शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत आहोत अश्या भावना व्यक्त केल्या तर कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह,संभाजीनगर, सुरत ,नाशिक, मुंबई ,रत्नागिरी, मध्य प्रदेश, या ठिकाणाहून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हजेरी लावली होती. शिक्षकांमधून मार्गदर्शनपर युवराज पाटील, प्रशांत सोनवणे, संजय गोसावी, सुधीर चौधरी यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य व्हि.जि.तेली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री नेवे, सूत्रसंचालन सुपडू संदानशिव, आभार प्रदर्शन लता मनोरे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी धरला हजेरी घेण्याचा आग्रह कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी हजेरी घेण्याचा आग्रह धरल्याने त्या वर्षाचे वर्गशिक्षक एम.पी.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे हजेरी घेत विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी, हितेंद्र धनगर , लतीफ तडवी, जरीना तडवी,स्वप्निल कोळी,राजू तडवी,रसूल तडवी, कैलास सोनवणे,निखिल सपकाळे,महेश पाटील, पंकज पाटील,सुनील पाटील, राजा तडवी, हमजान तडवी,सतीश पाटील, गीता राजपूत, लता मनोरे, सोनाली राजपूत,शारदा मनोरे, सुरेश राजपूत, उषा तडवी, राधा राजपूत, जायदा तडवी, मिथुन गजरे ,माधुरी राजपूत,अब्दुल तडवी, जागृती पाटील, फकिरा तडवी,शहानूर तडवी,माधुरी राजपूत,कविता पाटील, रमजान तडवी,गुलशान तडवी, बिस्मिल्ला तडवी, सुकदेव पाटील तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांनी दिले शालेय उपयोगी वह्या, पेन, शैक्षणिक साहित्याचे किट प्रसंगी वाटप करण्यात आले, त्या वेळेस वसतिगृहातील मुलांच्या चेहऱ्या वरील आनंद वेगळाच पाहण्या जोगा होता.






Social Plugin