Ticker

6/recent/ticker-posts

विकास कामांची पाहणी करून दोषीवर गुन्हे दाखल करा-भारतीय दलित महासंघ



प्रतिनिधी - केतन खिलारे माळशिरस तालुका प्रतिनिधी

15 व्या केंद्रीय वित्त आयोगा अंतर्गत विविध कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप झाले आहे. सन 2020 ते सन 2025 या कालावधीमध्ये रस्ते, गटारी, हायमास्ट दिवे, खुली व्यायाम शाळा, साहित्य अशी विविध प्रकारची कामे माळशिरस तालुक्यामध्ये उपलब्ध ग्रामपंचायतींनी केले असल्याचे प्रारूप आराखडा तपशिलावर दिसत आहेत.झालेली कामे विकास आराखडा यादीत नमूद आहेत परंतु प्रत्यक्षात दिसत नसल्याचा आरोप भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख रोहित रणदिवे यांनी केला आहे.

संपूर्ण कामाची यादी व निधीची माहिती प्राप्त करून संबंधित उपविभागीय अधिकारी सौ.विजया पंगारकर तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांना दि. 05-03-2025 निवेदन दिले आहे. जाहीर संपूर्ण कामाची स्थळ पाहणी पंचनामे करून दोषी ग्रामसेवक, सरपंच, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच या संबंधित काम करणारी संस्था व यामध्ये सामील असलेल्या शासकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा दि.25/03/2025 रोजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश चिंतामणी खंडागळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव दिगंबर साठे, माळशिरस तालुका अध्यक्ष केतन खिलारे, अकलूज शहराध्यक्ष दीपक विटकर, सोलापूर जिल्हा संघटक अनिल मदने, सोलापूर जिल्हा सहसचिव नंदकुमार काळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.