बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील गोंदी येथील श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात चिमुकल्यांनी देवा श्री गणेशा, वो किसना है, झुमक्या वाली पोर, माऊली माऊली, इत्यादी मराठी व हिंदी गाणी सादर केली होती. विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. गोंदी येथील श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच देवी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, त्यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी व्यासपीठावर मनोज काका मरकड, पंकज सोळुंके, शेखर बापू सोळुंके, डॉक्टर गणेश पवार, पोलीस निरीक्षक अशीष खांडेकर, सरपंच सुनीता गव्हाणे, संजय मरकड, विस्तार अधिकारी शिंगारे सर, केंद्रप्रमुख चंद्रकांत खरात, तुकाराम सातपुते, शिंदे सर, पांडुरंग मरकड, पत्रकार बंडु शिंगटे, माऊली दोबाले, आटोळे साहेब, सुरेश नरोडे पीआय तुळजापूर, मनीष नरोडे सर, दीपक सोळुंके, अयोध्या ताई मरकड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खरात सर यांनी प्रस्ताविक पर शाळेविषयी थोडक्यात आढावा मांडला तसेच सहकार्याबद्दल पालकांचे आभार व्यक्त करून भविष्यात आपली शाळा आणखी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपारिक नृत्य, नाटिका, गीते, आणि विविध कला सादर करण्यासह विविध गीतावर बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमात मोठी रंगत आणत उपस्थित त्यांची मने जिंकली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्नेहसंमेलनासाठी श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलच्या संचालिका उषाताई सोळुंके, संस्थापक अध्यक्ष किशोर सोळुंके सर, मुख्याध्यापक प्रवीण खरात सर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षिका ग्रामस्थ विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





Social Plugin