Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुक्यात वाघाने घेतला एकाचा बळी



ग्रामिण प्रतीनीधी : यादवराव बुराडे

लाखांदुर - तालुक्यातील मौजा खैरी/पट, विहीरगाव, डांभेविरली व टेंभरी या गावांमध्ये मागिल १५ ते २० दिवसांपासून पट्टेदार वाघाचे दर्शन होत असून, अनेक जनावरांची शिकार झाली आहे. अशातच रविवार दि. ३० मार्च २०२५ रोजी मौजा खैरी/पट येथील श्री. डाकराम देशमुख नामक शेतकरी सायंकाळी ५ वाजता सुमारास स्वत:च्या शेतावर (वाघ प्रतिबंधित क्षेञात) पंप चालु करायला गेला असता, अद्याप घरी परतला नाही. दरम्यान आत्ता मध्यराञी सुमारास लाखांदूर वनपरीक्षेञ अधिकारी कार्यालयाची चमु व पोलीस प्रशासन लापता असलेल्या डाकराम देशमुख यांच्या शोधकार्य करीत आहे. घटनास्थळावर लापता इसमाची सायकल असून, शेकडोच्या संख्येने गावकऱ्यांची गर्दी आहे.