देगलूर- प्रतिनिधी
सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे *गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव अंतर्गत गांधी तीर्थ स्वच्छ शाळा, राज्यस्तरीय स्पर्धा 2024- 2025 रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. हायस्कूलच्या कला विभागातील 50 मुली व व20 मुलांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांतील स्वच्छता विषयक कल्पना रांगोळीतून मांडल्या. या स्पर्धेत इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम- श्रद्धा राजेश्वर कवडे द्वितीय- अनुष्का प्रभाकर नरवाडे तृतीय- कीर्ति बसवंत मुंगड़े उत्तेजनार्थ- ओमकार संग्राम लष्करे या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेसाठी कलाशिक्षक नंदकुमार ओतारी व विठ्ठल हराळे सर तसेच गांधी परीक्षेचे समन्वयक कैलास कोदळे यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. येथील शाळा विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष लक्ष देऊन शालेय उपक्रमांतून कला गुणाना वाव देण्यात येतो. या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलामूलिंचे मुख्यध्यापक श्री संभाजी गायकवाड़ यांनी कौतुक केले.





Social Plugin