Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळा निढळ येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

 


बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 निढळ ता खटाव येथे जिल्हा परिषद शाळा यांचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी चिमुकल्यांनी अनेक नृत्य आविष्कार सादर केले. मुलामध्ये व पालकांमध्ये प्रचंड उत्साह यावेळी दिसून आला.यावेळी ग्रामस्थांनी अनेक रुपयांची बक्षिसे चिमुकल्याना दिली .

 गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते ,विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख संजय दीडके,गणेश जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक दीपक भुजबळ,राऊत सर,देसाई सर,जगताप सर,पवार सर ,कोरडे मॅडम ,बनकर मॅडम ,शाळा व्यवस्थापन समिती  यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले . यावेळी ग्रामस्थ  व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सूत्र संचालन हनुमान विद्यालय निढळ चे पर्यवेक्षक कांबळे एस एन सर यांनी केले .आभार संतोष खुस्पे यांनी मानले.