Ticker

6/recent/ticker-posts

टीबी मुक्त ग्रामपंचायतीला ग्राम पुरस्कार



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी


कारंजा : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर ग्रामपंचायतला टीबी मुक्त ग्राम पुरस्कार दि २७ मार्च रोजी कारंजा पंचायत समीतीच्या गटविकास अधीकारी पूनम राणे यांनी प्रदान केला. गावचे सरपंच नितीन पा उपाध्ये; ग्रामपंचायत अधीकारी सतीष वरघट; आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघमारे; आरोग्य सहाय्यक आत्माराम सोनोने सह आरोग्य पथक काजळेश्वर यांनी पुरस्कार स्विकारला. वृत्त असे की शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेद्वारा ग्रामपंचायत तथा जिल्हा तथा कारंजा तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शनात काजळेश्वर येथील आरोग्य पथकाने दिशादर्शक कार्य करून ग्राम काजळेश्वर टीबी मुक्त केले त्यामुळे टीबीमुक्त ग्राम म्हणून काजळेश्वरला ग्राम पुरस्कार कारंजा पंचायत समीतीच्या गटविकास अधीकारी पूनम राणे यांचे हस्ते ग्रामपंचयात सरपंच नितीन पाटील उपाध्ये ग्रामपंचायत अधीकारी सतीष वरघट; गावचे आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघमारे कारंजा गटविकास अधीकारी पूनम राणे यांनी केला ग्रामपंचायत व आरोग्य सेवा कर्मी यांचा सन्मानप्रशांत वाघमारे व आरोग्य पथकाला प्रदान करीत त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. यावेळी सहाय्यक गटविकास अधीकारी कैलास घुगे; तालूका आरोग्य अधिकारी डॉ एस आर नांदे यांची प्रमुख उपस्थीती होती. 

काजळेश्वरचे सरपंचनितीन पाटील उपाध्ये; उपसरपंच तैसीम भाई; ग्रामविकास अधीकारी सतीष वरघट यांचे सह समस्त ग्रामपंचायत कर्मचारी वृंद; डॉ प्रशांत वाघमारे; डॉ चेतन राठोड; श्रीमती मंजू जाधव आरोग्य सेवीका; देवीचंद राठोड आरोग्य सेवक; अनोष तोडे आरोग्य सेवकः श्रीमती योगीता वानखडे आरोग्य सेविका; बंडू पाटील उपाध्ये आरोग्य कर्मचारी; श्रीमती विजया बासोडे गटप्रवर्तक; श्रीमती वनमाला बंड; सुषमा सावरकर उषा खंडारे यांच्या कार्याचा गटविकास अधीकारी पूणम राणे; सहाय्यक गटविकास अधीकारी कैलास घुगे यांनी गौरव केला. गावला टीबीमुक्त ग्राम पुरस्कार मिळाल्याने तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्ये; ख वि संघाचे संचालक विनोद पाटील उपाध्ये; राजे सामाजीक संघटणेचे ओमप्रकाश वानखडे; माऊली हरीपाठ मंडळाचे स्वप्नील फरास इत्यादी सह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.