सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा :- तालुक्यातील यंदा होळी गुरुवारी आणि धुलीवंदन कर शुक्रवारी आली. शुक्रवारी करीचा दिवस आल्याने सिंदखेड राजा तालुक्यातील खवय्यांसाठी हा चांगलाच योगायोग जुळून आला. किंनगाव राजा येथे शुक्रवारी कर मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. दिवसभर हॉटेल धाबे आणि मटन भोजनालये गर्दीने फुलून गेले होते. यानिमित्ताने किनगाव राजा करानी बोकड, हजारो कोंबड्या फस्त केल्या. त्यामुळे यंदाची कर मस्त राहिली.
गुरुवारी होळी साजरी केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळपासूनच खवय्यांनी मटणाचा बेत करण्याचे नियोजन केले होते
त्यानुसार काही लोकांनी हॉटेल धाबे निवडले, काही लोकांनी शेतात पार्टी केल्या तर काही लोकांनी मटन भोजनालयांमध्ये गर्दी केली होती. तर सर्वसामान्य नागरिकांनी घरीच मटणाचा बेत करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे काल दिवसभर मटन मांस खाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. मटनाच्या दुकानावर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.
अनेकांनी कुटुंबासोबत कर साजरी केली होती. त्यामुळे काल मटनाची व चिकनची तुफान विक्री झाली. नागरिकांनी सकाळपासूनच मटनाच्या दुकानावर रांगा लावल्या होत्या. काल 700 रुपये प्रति किलो दराने मटणाची विक्री करण्यात आली. 160 ते 200 रुपये पर्यंत चिकनची विक्री करण्यात आली. मासे आणि अंडी याचीही व जास्त करून बोकड मटण शुक्रवारी दिवसभरात विक्रमी विक्री झाल्याचे खाटीक ईसाक कुरेशी किंनगाव राजा याच्या कडून सांगण्यात आले.





Social Plugin