Ticker

6/recent/ticker-posts

अर्धा मसला येथे मजीतीमंध्ये झालेल्या प्रकारना बदल शांतता राखा ...


तालुका प्रतिनिधी  मारोती गाडगे/गेवराई 

गेवराई (बीड):-दि३०/०४रविवार रोजी गेवराई तालुक्यातील मौजे अर्धमसाला येथे घडलेला प्रकार दुर्देवी असुन त्याचा जाहीर निषेध करतो. बीड पोलिसांनी ही परिस्थिती अतिशय संवेदनशीलतेने व गांभीर्याने हाताळून  पहाटेच त्यांनी आरोपींना अटक केल्याचे समजते. 

मुस्लिम धर्मियांसाठी रमजान ईद आणि हिंदू धर्मीयांसाठी गुढीपाडवा हे दोन्ही सण अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे काही समाजकंटक जाणीवपूर्वक दोन्ही समाजामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे असे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत, याची मला खात्री आहे.

आपण सर्वजण मिळून अशा समाजविघातक कृत्याचा निषेध करत सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करू. चला, आज सामाजिक सलोख्याची गुढी उभारून नवीन आदर्श निर्माण करू.  कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, शांतता राखा.आसे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.