मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वाशिम यांची कारवाई वरली मटका जुगार खेळणाऱ्या इसमांवर धडक कारवाईत एकूण 2,10,900/-रुपयेचा मुद्देमाल जप्त.दि. 04/03/2025 रोजी गुप्त बातमीदाराकडून उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, मालेगाव येथील जुन्या बसस्टँडजवळ आनंद वाईनबारच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही इसम वरली मटक्याचा जुगार खेळत आहेत. अशा प्राप्त माहितीवरुन श्री. नवदीप अग्रवाल भा.पो.से. यांनी त्यांचे पथकासह बस स्टैंड येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी मिलन तसेच कल्याण नावाचे जुगारावर लोक पैश्याचे हारजितने जुगार खेळतांना मिळुन आले. आरोपीकडून 1. नगदी 19,720/- रुपये, वरली मटक्याच्या चिठ्या, हिशोबाचे रजिष्टर, बॉल पेन कि. 10/-रुपये, कॅलक्युलेटर कि.100/-रुपये, 2 मो.सा. किं. 1,40,000/-रुपये, 06 मोबाईल कि. 51,000/- रुपये असा एकूण 2,10,900/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर अवैध वरली मटक्याचा जुगार चालविणारे व जुगार खेळणारे एकूण 11 आरोपींवर पोस्टे मालेगाव येथे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.
आरोपी- 1. रमेश शिवलाल राठोड 2. अनिल सुदाम कांबळे 3. गोपाल सुर्यभान खुळे 4. विलास नारायण कुटे 5. गणपत गोविंदा धोंगडे 6. विजय गोपाल बोरकर 7. बाळु भगवान सावळे 8. प्रविण मधूकर कानेड 9. महादेव किसन सरकटे 10. अशोक ओंकार वानखेडे 11. नंदू तुळशिराम खडसे
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुज तारे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस अधिक्षक श्री. नवदीप अग्रवाल, पोहेकाँ अरविंद राठोड, पोहेकाँ हरिभाऊ कालापाड, पोकाँ स्वप्नील शेळके, पोकाँ शंकर वाघमारे चापोकाँ गणेश बाजड यांनी केली.





Social Plugin