मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव ता 15 - मालेगाव शहरातील श्री संत गुणवंत बाबा संस्थान भेरा दरबार वर उद्या ता 16 मार्च रोजी श्री संत गुणवंत महाराज जीवन अमर गाथा व अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होत आहेया सप्ताहाची सांगता ता 23 मार्च रोजी महाप्रसादाने होणार आहे या साप्ताहाचे आयोजन प पू पवन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे
साप्ताहात रोज सकाळी 5.00 ते 6.00 वाजेपर्यंत काकडा भजन,सकाळी 11 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत व दुपारी 3.00 ते सायंकाळी वाजेपर्यंत श्रीमद भागवत कथा होणार आहे सायंकाळी 5.00 ते 6.00 वाजेपर्यंत हरिपाठ होणार आहे रात्री 8.30 ते 10:30 वाजेपर्यंत किर्तन सेवा राहणार आहे श्रीमद् भागवत कथेचे वाचन भगवान महाराज काळे दुधाळकर करणार आहेत गजानन देविदास धोंगडे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम ता 16 मार्च रोजी दुपारी 12.00 ते 3.00 वाजेपर्यंत होणार आहे सायंकाळी 6.00 ते 10.00 कालंकामाता संच भेरा यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे ह भ प अमोल महाराज जाधव यांचे कीर्तन ता 18 मार्च रोजी होणार आहे बाल कीर्तनकार हभप पंकज महाराज पेनबोरी यांचे कीर्तन ता 19 मार्च रोजी होणार आहे ह भ प देविदास महाराज सावंत यांचे कीर्तन ता 20 मार्च रोजी होणार आहे ह भ प विजय महाराज सुळे यांचे कीर्तन ता 21 मार्च रोजी होणार आहे ह भ प गजेंद्र महाराज पाटील यांचे कीर्तन ता 22 मार्च रोजी आहे ता 23 मार्च रोजी ह भ प भगवान महाराज काळे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे नंतर दुपारी 12.00 वाजता नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे या सप्ताहात गायनाचार्य म्हणून ह भ प शिवाजी महाराज पोफळे ह भ प अंकुश महाराज दुधाळकर ह भ प बालाजी महाराज सरकटे हे काम पाहणार आहेत ह भ प अमोल महाराज मृदूंगाचार्य म्हणून सेवा देणार आहेत
या सप्ताहासाठी अन्नदाते म्हणून जगन्नाथ वामन भुसारी रा कॉ चे मालेगाव शहराध्यक्ष अरुण बळी,शत्रुघ्न परिसकर रंजनाताई काळे हरिभाऊ गायकवाड श्रीकृष्ण नांगरे भगवान साखरे सतीश धोंगडे डॉ अनिल तेलभाते सेवा देणार आहेत





Social Plugin