पालघर - ग्रामीण प्रतिनिधी धनेश क्षीरसागर
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा विद्यार्थ्यांनी आचरणात आणली पाहिजे-मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे
पालघर, दि. 13:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकविल्या त्या पैकी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हि शिकवण विद्यार्थ्यांनी आचरणात आणली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी विद्यार्थीना संबोधित करताना केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीc निमित्ताने पालघर जिल्ह्यात जय भीम पदयात्रा काढण्यात आली त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी विद्यार्थीना संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
श्री. रानडे म्हणाले की,बाबासाहेबानी आपल्याला ज्या तीन गोष्टी शिकवल्या आहेत त्याचे अनुपालन करावे. बुद्धिमतेचा विकास करणे हे आपले ध्येय असले पाहिजे. सगळ्यात महत्वाचे हक्क कधी मागून मिळत नसतात त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तो हक्क आपला आहे. ती जाणीवv होण्यासाठी काय लागते तर ते शिक्षण आहे. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. ते जो पिणार तो गुरगुरणार म्हणजे आपल्या हक्कासाठी संघर्ष करणार आणि मागणार हे विध्यार्थी यांनी लक्षात ठेवावे. बाबासाहेब आंबेडकर यांची लिखित संपदा पुस्तके आहेत ती नेहमी वाचली पाहिजेत. तत्कालीन परिस्थिती काय होती आणि आपण पुढे कुठे जायचं आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे असेही ते म्हणाले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दि.14 एप्रिल 2025 रोजी आहे. या जयंतीचे औचित्य साधून मुंबईसह राज्यभर दि.13 एप्रिल,2025 रोजी “जय भिम, पदयात्रा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने “जय भिम पदयात्रा” काढण्यात आली होती. ही पदयात्रा पाचबत्ती येथून सुरु करण्यात आली आणि डॉ.आंबेडकर चौक येथे समारोप करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास.व्हनमाने, तसेच अधिकारी, नागरिक आणि विद्यार्थी या पदयात्रेत उपस्थित होते
पालघर जिल्हयातील विविध विद्यालयातील विद्यार्थी,एनसीसी, एनएसएस, एनवायकेएस, भारत स्काउट गाईड माय भारत यामधील विद्यार्थी हि या पदयात्रेत सहभागी झाले होते.





Social Plugin