Ticker

6/recent/ticker-posts

गेवराईत पत्रकाराचे घर फोडले ; सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास.



गेवराईत चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान!

तालुका प्रतिनिधी  मारोती गाडगे/ गेवराई 

 (बीड):

    घरात कोणी नसल्याचा फायदा घेत पत्रकाराचे घर फोडून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड असा एकूण सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवार दि. ८ एप्रिल २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास ताकडगाव रोड, केशरदीप निवास गेवराई येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

       याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेवराई शहरातील मतिमंद निवासी विद्यालय,गेवराई येथे कार्यरत असलेले शिक्षक व दैनिक लोकाशाचे पत्रकार विनोद नामदेव पौळ रा. सुशी (व), हल्ली मुक्काम ताकडगाव रोड केसरदीप निवास गेवराई हे पत्नी व मुलांसह गेल्या सहा-सात वर्षांपासून गेवराई येथे राहतात तर दि.७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.३० वा. चे सुमारास पत्नीस शारदा हॉस्पीटल, गेवराई येथे प्रस्तुतीसाठी अँडमीट केल्याने घराला कुलूप लावून दवाखाण्यात गेले होते. दरम्यान दि.८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.३० वा.चे सुमारास घरी आले असता घराच्या दरवाजाला असलेला कोंडा कटरच्या सहाय्याने कट करुन दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसून आले त्यानंतर घरात प्रवेश करुन पाहीले असता घरातील पसारा अस्ताव्यस्त पाहताच घरात चोरट्यांनी चोरी केल्याचे निदर्शनात आले. दरम्यान घरातील कपाटाचा दरवाजा तोडून आतील साहीत्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले.

त्यांनी ताबडतोब या घटनेची गेवराई पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून कपाटातील लॉकर मधील सोन्याचांदीचे दागिने व नगदी रोख रक्कम असा एकूण एकोंसत्तर हजार तीनशे तीस रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. दरम्यान याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात कलम ३०५ (ए), ३३१ (४) भा. न्या. स.नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास गेवराई पोलिस ठाण्याचे पो.नि.प्रविणकुमार बांगर, स.पो.नि. संतोष जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धन्यपाल लोखंडे हे करत आहेत.