Ticker

6/recent/ticker-posts

राजू वाघमारे यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2025 जाहीर



कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

जालना: जालना समाजकार्य महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.राजकुमार म्हस्के तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रमेश गुजर व मार्गदर्शक प्रा. डॉ. सुधीर गायकवाड, प्रा.डॉ. रेणुका भावसार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना या विभागांतर्गत करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश खोसे यांनी केले, तसेच या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना आदर्श स्वयंसेवक पुरस्कार-2025 राजू डिगांबर वाघमारे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रा.डॉ. प्रविण कनकुठे, प्रा.डॉ. बालाजी मुंडे, प्रा.डॉ.मधु खोब्रागडे, प्रा.डॉ.दीपक बुक्तारे, प्रा.डॉ. नरसिंग पवार, प्रा.डॉ. मीना बोर्डे, श्री मलवार सर कार्यक्रमास्थळी उपस्थित या कार्यक्रमांना महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजू वाघमारे यांनी केले.