मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव ता ११ - क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त मालेगाव शहरांत शोभयात्रा आज ता 11 एप्रिल रोजी काढण्यात आली शोभायात्रेस सुरुवात दुपारी 4.३0 वाजता महात्मा फुले चौक माळी वेटाळ येथून झाली. सुरवातीला महात्मा फुले याच्या तैलचित्राचे पूजन करण्यात आले त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टर वर असलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले शोभयात्रे मध्ये महात्मा फुले यांचा पुतळा असलेल्या वाहना समोर वाशिम येथिल नरसीम्हा ढोलपथकाचे युवक युवती होते त्यांचे ढोल वादन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते या ढोल पथकात 30 युवक व 12युवती सहभागी झाले होते
शोभा यात्रेच्या मार्गवर रांगोळी काढण्यात आल्या होत्या पेपर ब्लास्ट लोकांचे लक्ष् वेधून घेत होता शोभायात्रा माळी वेटाळ, खवले वेटाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिव चौक, गांधी चौक, सराफ गल्ली, दुर्गा चौक मार्गे महात्मा फुले चौक येथे पोहोचली या शोभायात्रेत सहविलेल्या ट्रॅक वर महात्मा फुले यांचा पुतळा ठेवण्यात आला होता त्याच्या मागे महात्मा फुले व सावित्री बाई फुले यांचे तैल चित्र लावलेली वाहने होती या शोभा यात्रेत महात्मा फुले यांचे चित्र असलेले पिवळे ध्वज मानमोहक दिसत होते शोभा यात्रेत आबाल वृद्ध सहभागी झाले होते शोभयात्रे मध्ये ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्था गोभणी येथिल टाळ घेतलेले 25 युवा वारकरी सहभागी झाले होते त्यांनी भजने सादर केली महात्मा यांची जयंती 11एप्रिल रोजी आहे तर त्यांना गुरु मानणाऱ्या भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी आहे त्यामुळे या दोघांनाही अभिवादन या शोभायात्रे द्वारा करण्यात आले या शोभायात्रेत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर श्रद्धा असणाऱ्या नागरिक सहभागी झाले होते ----------------*--------





Social Plugin