गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
येत्या ४ ते ६ एप्रिल दरम्यान तीर्थक्षेत्र पोहरागड व उमरीगड येथे श्री संत शिरोमणी सेवालाल महाराज यांचा यात्रोत्सव होत असून भारत देशातील कानाकोपऱ्यातून हजारो साधु-संत महंत आणि लाखो भाविक भक्तिभावाने दर्शनासाठी येतात. तीन दिवस गोर बंजारा धर्मपीठ, भक्तीधाम पोहरागड येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या धर्म पत्नी अमृता फडणवीस महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड इंद्रनील नाईक बसनगौडा पाटील कर्नाटक खासदार संजय देशमुख निलय नाईक अनंतकुमार पाटील कारंजा मानोरा विधानसभा आमदार सईताई डहाके रामेश्वर भाऊ नाईक मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख अमोल पाटणकर ओ एस डी धर्मगुरू जितेंद्र महाराज व सर्व संत महंत महाराज भगवंत सेवक, धर्मनेता किसन राठोड यांच्या सहकार्याने, गोर बंजारा धर्मपीठ, भक्तीधाम परिसरात हजारो भाविक भक्तांची निवास आणि महाप्रसादाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे यंदाही केली आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड यांनी केले आहे.
धर्मपीठ, भक्तीधाम येथे धर्मपरिषद, साहित्य परिषद, राजकीय परिषद, स्नेह मेळावा, सन्मान सोहळा, भजन, गायन, कीर्तन, प्रबोधन, बंजारा सांस्कृतिक सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. गोर बंजारा धर्मपीठ, भक्तीधाम येथे भाविक भक्तांच्या सेवेसाठी सर्व राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सेवाधारी आणि स्वयंसेवक म्हणून उपस्थित रहावे.





Social Plugin