Ticker

6/recent/ticker-posts

राजनी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी



प्रतिनिधी - शैलेश कवळे 


लाखांदूर तालुक्यातील मौजा राजनी येथे पंचशिल बौध्द विहार राजनी यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना लाखांदूर तालुका प्रमुख देवचंदभाऊ कावळे उपाध्यक्ष मनोजकुमार ठाकरे ग्रा.प.सदस्य तथा धान्यं व्यापारी विशेष अतिथी गोपाल तऱ्हेकार ग्रा.प.उपसरपंच, संदिप मेश्राम सरपंच, गुरुदेव तिघरे पो.पाटिल,राजेश गजभिये,कलिराम ठाकरे, मंगलमूर्ती रोकडे स्वस्त धान्य दुकान,दौलत ठाकरे,निकलेश रामटेके, यशवंत निबेकार ग्रा.प.सदस्य, मनोहर बगमारे ग्रा.प.सदस्य, रागिणी ठाकरे ग्रा.प.सदस्य,व इतर मान्यवर बौद्ध उपासक उपासीका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

   गावांमध्ये ऱ्याली काढण्यात आली व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तर बौद्ध समाजाच्या वतीने संपुर्ण गावकऱ्यांना जेवणाचा कार्यक्रम देण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभपर्वावर राजनी ग्रामपंचायत च्या वतीने घर टॅक्स व पाणी पट्टी वसुली संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांनी स्व खर्चातुन लकि ड्रा ची सोडत करण्यात आली या लक्की ड्रा मध्ये प्रथम बक्षीस 32 ईचं एल ई डी,दुसरा बक्षीस मिच्छर मशिन,तिसरा बक्षीस प्रेशर कुकर,चौथा बक्षीस पोळ्याचा डब्बा, पाचवा बक्षीस टिफीन डब्बा यांची ड्रा च्या माध्यमातून सोडत करुण मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रसंगी पंचशिल बौध्द विहार राजनी येथील अध्यक्ष दिलीप ढोके व सोमेश्वर लोणारे यांनी मान्यवरांचे आभार मानले.