तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई, दि. ८ दिगंबर ईश्र्वर विभुती ! राहिल्या त्या कीर्ती जगामाजी!!-ब्रह्मलीन वैकुंठवासी वेदांताचार्य रामभाऊ महाराज वाघमारे गेवराई तालुक्यातील मादळमोहीकर यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त त्यांचे नातू हभप ओंकार महाराज वाघमारे यांनी पैठण येथे १५ एप्रिल ते २२ एप्रिल २०१५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व संगीत शिव महापुराण कथेचे आयोजन केले आहे . ध्यानधारणा व ब्रह्मचिंतन अनुसंधान, तिळवण तेली समाज धर्मशाळा, श्री संत संताजी जगनाडे महाराज मठ श्रीक्षेत्र पैठण जिल्हा औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ १५ एप्रिल रोजी होत असून २२ एप्रिल रोजी त्याची सांगता होणार आहे
. या सप्ताहाला हरिभक्त परायण श्रीक्षेत्र संस्थान नारायणगड मठाधिपती महंत शिवाजी महाराज, हभप रामभाऊ महाराज राऊत गंगापूर, पंडित महाराज क्षीरसागर आळंदी , रखमाजी महाराज नवले पैठण, श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी महंत संभाजी महाराज, हभप कृष्णा महाराज, हभप प्रकाश महाराज बोधले ,हभप दिलीप महाराज घोगे आदी संत - महंत या सोहळ्याला सदिच्छा भेट देणार आहेत .या सप्ताहामध्ये पहाटे ४ ते ५ काकडा भजन, ५ ते ६ ध्यानधारणा, ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम, सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान शिवपुराण हभप ओंकार महाराज वाघमारे हे संगीत शिव महापुराणाची कथा सांगतील . १ दुपारी ते ३ दरम्यान प्रवचन, ३ ते ५ हरिपाठ , ५ ते ७ हरिकीर्तन दररोज होईल . १५ एप्रिल रोजी सप्ताहाची सुरुवात हभप राहुल महाराज ढेंगे मादळमोहीकर ,१६ एप्रिल रोजी हभप बन्सी महाराज काळे भूम, १७ एप्रिल रोजी विश्वंभर महाराज नवले पैठण, १८ रोजी हनुमंत महाराज घोलप तलवाडा, १९ रोजी देविदास मिसाळ केरळा, 20 एप्रिल रोजी आकाश महाराज जगताप बार्शी आणि शेवटचे कीर्तन २१एप्रिल हभप सौ . प्रमिलाताई ढेंगळे यांचे हरिकीर्तन होईल
.काल्याचे किर्तन २२ एप्रिल रोजी हभप ओंकार महाराज वाघमारे मादळमोहीकर यांच्या वाणीतून सकाळी १० ते १२ या वेळेत होऊन नंतर महाप्रसाद वाटप होईल .या सप्ताहाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थिती द्यावी आणि अध्यात्माचा लाभ घ्यावा ,असे आवाहन हभप ओंकार महाराज वाघमारे यांनी केले आहे .





Social Plugin