मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी:मालेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या मेडशी पोलीस चौकी येते दर वर्षी प्रमाणे यंदा ही मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मेडशी चौकी येते कार्यरत असलेल्या सर्व पोलीस बांधवांकडून हनुमान जयंती आनंदात साजरी करण्यात आली.
पोलीस कर्मचारी येतात जातात. ड्युटी ही चेंज होत राहते. परंतु पूर्वेपासूनच वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आज ही कायम आहे. सर्व प्रथम मेडशी पोलीस चौकी मधील हनुमान मंदिरातील मूर्तीची आरती व पूजन करून मेडशी गावातील 400ते 500 भाविकांना आमंत्रित करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मेडशी येथील बहुसंख्यिक भाविकांनी हनुमान मंदिरात दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाला पो.हे.का. भानुदास निवाने,निलेश अहिर, ज्ञानेश्वर सानप पो.शिपाई केशव गोडघासे
याचे विशेष सहकार्य लाभले
.jpg)




Social Plugin