गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यामधील कारंजा लाड येथे बापाने घरगुती जमिनीच्या वादातून आपल्याच मुलाची चाकू भोसकून हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 11) रात्रीच्या सुमारास कारंजा शहरात घडली. अनिल गोपाल मोखडकर (रा. कारंजा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी गोपाल मोखाडकर (60, रा. कारंजा) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध कारंजा पोलिस स्टेशनला डीएनएस 103 गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीदरम्यान गोपाल आणि त्यांचा मुलगा अनिल यांच्यात घरगुती वाद झाला होता. मात्र अनिलने पुन्हा वाद उखरून काढल्याने या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपी बापाने अनिलच्या पोटात चाकू भोसकला. तसेच चाकूने त्यांच्या पोटात 3-4 वार केले. यामध्ये मुलगा अनिल गंभीर जखमी झाला. अशातच अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले असून कारंजा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. बापानेच आपल्या मुलाची हत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात कारंजा शहर पोलिस करीत आहेत.





Social Plugin