मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव तालुक्यातील रिधोरा येथे असणाऱ्या प्राचीन श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आला या निमित्य २९ ते ३१ मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमासह कलश स्थापना व मूर्ती स्थापना करण्यात आली.गावकऱ्यांच्या वतीने प्रसिद्ध व प्राचीन मंदिराचा जिर्णोद्वार करण्यात आला असता ३१ मार्च रोजी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.भावीक भक्तांचे श्रद्धास्थान असणारे मौजे रिधोरा येथील प्राचीन असणारे श्री हनुमान मंदिराची अतिशय दुरावस्था झाली असता गावकऱ्यांच्या वतीने लोक वर्गणीतून व लोक सहभागातून या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असता आकर्षक व भव्य मंदिर या ठिकाणी बांधण्यात येऊन या मंदिरात श्री हनुमान मूर्तीची पुनरस्थापना करण्यात आली.या निमित्त २९ ते ३१ तीन दिवस कार्यक्रम घेण्यात आले. २९ मार्च रोजी गावातून कलशची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गावकरी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.तर ३० मार्च रोजी मंदिराच्या शिखरावर कलश स्थापना करण्यात येऊन मंदिरात श्री हनुमान बजरंग बलीच्या मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात व विधिवत विद्या पूजा करून करण्यात आली.त्यानंतर रात्रीच्या वेळी दी 30 मार्च रोजी ह भ प शितलताई महाराज सांगळे यांचे व 31 मार्च ह भ प इंगोले महाराज यांचे कीर्तन झाले.पूजेचा विधी मालेगाव येथील पांडे महाराज यांच्यासह इतर ब्राह्मण वृंदांनी पार पडला. श्री हनुमान मूर्ती की प्राणप्रतिष्ठा निमित्त ३१ मार्च रोजी गावात महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला असता गावकऱ्यासह परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.अतिशय जीर्ण झालेल्या प्राचीन हनुमान मंदिराच्या जीर्णोद्वारामुळे या ठिकाणी भव्य आकर्षक मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून मंदिराला सुशोभीकरण करण्यात आले असता या ठिकाणच्या सौंदर्यकरणात वाढ झाली आहे. मंदिरातील श्री हनुमान मूर्ती ही प्राचीन असून भाविकाभक्तांची श्रद्धास्थान असणाऱ्या या मूर्तीच्या पुनर्रस्थापनेमुळे व मंदिराच्या बांधकामामुळे भाविकात समाधानाचे वातावरण पसरले आहे.





Social Plugin