*मालेगाव तालुक्यातील शौचालय लाभार्थी लाभाच्या प्रतिक्षेत*
मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव : 'स्वच्छ भारत मिशन' (ग्रामीण) योजनेअंतर्गत, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते,. या योजनेत, वैयक्तिक शौचालयासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानाची तरतूद असताना पण आज रोजी मालेगाव पंचायत समितीला अनेक महिन्यापासून सन 2024 /2025 चा निधी उपलब्ध नसल्यामुळे मालेगाव तालुक्यातील अनेक शौचालय लाभधारक हे कागदपत्रांची पूर्तता करूनही. पात्र असताना पण सध्याच्या स्थितीमध्ये लाभापासून वंचित असून तर काही नागरिक हे मालेगाव पंचायत समिती येथे चकरा मारू मारू अक्षरशः त्रासल्याचे ही चित्र दिसत आहे.
या संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी या महत्त्वाच्या बाबीकडे आपले लक्ष केंद्रित करून. शासनाकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निधी प्राप्त करून मालेगाव तालुक्यातील पात्र असलेल्या शौचालय लाभधारकांना त्यांचे हक्काचे लाभ मिळून दयावे. अशी मागणी नागरिकांना कडून होत आहे.





Social Plugin