Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथे हजारो रामभक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ



कारंजा (लाड): पराग कु-हे प्रतिनिधि

श्रीराम नवमी उत्सवानिमित्त ९ एप्रिल रोजी येथील मोठे राममंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा लावून त्यांना शिस्तबद्ध महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी सुमारे ६ ते ७ हजार रामभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला 

श्रीराम नवमी उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा श्रीराम नवमी उत्सव मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त सात दिवसीय भागवत कथा सप्ताह, मोटारसायकल फेरी व अन्य धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

दरवर्षीच्या धार्मिक परंपरेनुसार महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होत असते. ही प्रथा यंदाही कायम ठेवण्याच्या अनुषंगाने बुधवारी रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत १३ क्विंटल गहू पिठाच्या पोळ्या तयार करून महाप्रसाद महिला आणि पुरुष भक्तांना वेगवेगळ्या रांगा लावून शिस्तबद्ध पद्धतीने वितरीत करण्यात आला. श्रीराम नवमी उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच रामभक्त स्वयंसेवकांनी महाप्रसाद वितरणासाठी अथक परिश्रम घेतले. रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू होते.