बुध दि .[प्रकाश राजेघाटगे]
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये हनुमान विद्यालय निढळ तालुका खटाव या शाळेचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला याबद्दल विद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या बद्दल रयत शिक्षणसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी अभिनंदन केले .
या शाळेत सुसज्य ग्रंथालय अत्याधुनिक प्रयोगशाळा ,अटल लॅब , सुसज्ज वर्गखोल्या, कार्यालय, शिक्षक कक्ष, बोलक्या भिंती, रयत गुरुकुल प्रकल्प, विविध शैक्षणिक विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम, परसबाग, वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन कौशल्ये शिक्षणासाठी आधुनिक वर्कशॉप इत्यादी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या बद्दल हनुमान विध्यालय निढळचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.





Social Plugin