Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार संघटनेचे शिवसेना आ. हिकमत उढान यांच्या निवासस्थानाबाहेर मशाल पेटवून आंदोलन



बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे.बच्चू कडूंची प्रहार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर रात्री मशाल पेटून आंदोलन करण्यात आले.या राज्यभर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  घनसावंगी येथे शिवसेनेचे आमदार हिकमत उढाण यांच्या निवासस्थानाबाहेर प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख राम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वतीने मशाल पेटवून आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख राम ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या विषयाचा उल्लेख होता.तसेच महायुतीच्या नेत्यांनीही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू,असे आश्वासन दिले होते.मात्र,अद्यापही कर्जमाफीबाबतचा निर्णय झालेला नाही.त्यामुळे मशाल पेटवून आंदोलन करण्यात आले.दिवसा शेतकरी या सरकारला दिसत नाही.म्हणून रात्री मशाल घेऊन आंदोलन करत आहोत.तेव्हा तरी आम्हाला पहा अशी टीका राम ठाकूर यांनी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर राम ठाकूर म्हणाले की,आज राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.शेतकऱ्याच्या घरातला दिवा गेला,वात गेली.दिवसा शेतकरी या सरकारला दिसत नाही म्हणून रात्री शेतकरी टेंबा घेऊन आम्हाला आतातरी पाहा.शेतकऱ्यांवर आस्मानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकटे आली आहेत.याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे.आता ते जर आम्हाला तारखा देत असतील तर तारखाची वाट आम्ही पाहणार नाही,असे तालुका अध्यक्ष राम ठाकूर यांनी सांगितले.यावेळी प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती ही लक्षणीय होती.