बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील फडतरवाडी (बुध) चे सुपूत्र आणि सध्या ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना ग्रामविकास विभागाकडून सन २०२२-२३ या वर्षासाठी उत्कृष्ट कार्याबद्दल गुणवंत अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अविनाश फडतरे यांनी गटविकास अधिकारी म्हणून पाटण आणि कराड येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. तर सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) म्हणून ही कार्यभार सांभाळला होता. त्यांची पाटण, कराड तालुक्यात जनमानसात लोकप्रिय प्रतिमा, अनेक सार्वजनिक उपक्रम, योजना यशस्वी करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत विभाग नेहमीच प्रत्येक उपक्रमात आघाडीवर आणि प्रशासकीय कामकाजात दबदबा निर्माण केला होता.
सध्या कोकण विभागातील ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अविनाश फडतरे यांनी सातारा मध्ये असताना कराड पंचायत समितीला यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात दुसरा क्रमांक व राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मध्ये पंचायत समिती देशात प्रथम क्रमांक मिळाला होता. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये जिल्हा परिषद साताऱ्याचा देशांमध्ये प्रथम क्रमांक आणण्यामध्ये मोलाचा वाटा होता, तसेच सातारा प्रेरणादायी कार्य केले होते. ग्रामपंचायत भवन बांधकाम, पाणी पुरवठा योजना, उपजीविका अभियान, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, पथदिवे योजना, विविध इमारत बांधकाम योजना, रोजगार हमी योजना, तसेच पंचायत राज यंत्रणेच्या डिजिटलायझेशन अशा अनेक विभागांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या पारदर्शक प्रशासकीय प्रक्रियेतील योगदान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य यामुळे त्यांना हा शासनाकडून गुणवंत अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
जिल्हाात त्यांनी केलेल्या सकारात्मक प्रशासन, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकाभिमुख काम, कार्यक्षेत्रातील प्रामाणिकता, काटेकोर नियोजन आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक समजला जाणारा हा पुरस्कार फडतरवाडी (बुध) चे सुपुत्र असलेल्या अविनाश फडतरे यांना जाहीर झाला आहे. यामुळे जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली असून याबद्दल विविध स्तरातून त्यांची अभिनंदन केले जात आहे.
शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्रचा गुणवंत अधिकारी अविनाश अंकुश फडतरे एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून अधिकारीपर्यंत प्रवास हा युवकांसाठी खूप प्रेरणादायी एका खेड्यातून महाराष्ट्राचा गुणवंत अधिकारी होऊ शकतो त्याचा एक उत्तम उदाहरण आहेत.
Social Plugin