Ticker

6/recent/ticker-posts

आदमपूर येथे घराला आग लागून लाखोंचे नुकसान.



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.


 बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे दि. 21 च्या रात्री दीड ते दोनच्या सुमारास जिवंत तारेच्या घर्षणामुळे घरास आग लागून लाखोंचे नुकसान झाले. आदमपूर येथील एका गरीब  शेतकरी  माधव गोविंद देवारे  यांचे घर महावितरणाच्या गावात विद्युत खांबावरून विद्युत पुरवठा करणाऱ्या जीवंत तारे लगत  आहे. 21 रोजी रात्री दीड ते दोनच्या सुमारास जिवंत तारेच्या घर्षणामुळे त्यांच्या घराला आग लागून एक लाख 23 हजार व चार तोळे दागिने व माधव यांचे भाऊ नागनाथ गोविंद देवारे व वहिनी सौ मेघा नागनाथ देवारे यांचे मागील वर्षी लग्नात आलेले नवीन कपडे अंदाजे साठ हजार रुपये, 65 हजार रुपयांचा लॅपटॉप, 20000 पर्यंत सोपासेट, वीस हजार रुपयांचा मोबाईल व पाच हजार रुपयांचा कुलर इतर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. 

      हे सकाळी समजताच आदमपूरचे सरपंच (प्र) दिलीप संपतराव भुसावळे हे बिलोली तहसीलदार श्री गजानन शिंदे सर यांना आपल्या फोन द्वारे कळविले असता शिंदे साहेबांनी तात्काळ मंडळ अधिकारी एल.एच. पंगे, आदमपूरचे तलाठी मिलींद सुपेकर यांना पाठवून पंचनामा करण्यात आला. व तसेच भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष श्री मारुती राहीरे यांनी आपल्या फोन द्वारे देगलूर ग्रामीण महावितरणचे मुख्य अभियंता श्री अमित त्रिवेदी यांना कळविले असता त्यांनी पण श्री गोविंद देवारे यांच्या घरी येऊन पाहनी केली. यावेळी गावातील माजी सरपंच प्रभाकर पेंटे, माजी सरपंच अरविंद पेंटे यांनी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.