बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या सर्व सदस्यांची रविवारी दुपारी 1 वाजता एस जी एम कॉलेज कराड येथे बैठक पार पडली तरी या बैठकीत नूतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्षपदी जनता शिक्षण संस्थेचे , किसनवीर महाविद्यालय वाई च्या प्रा. डॉ. विलास खंडाईत यांची तर सचिव पदी फलटण च्या श्रीराम एज्युकेशन सोसायटी , यशवंतराव चव्हाण ज्यु. कॉलेजचे प्रा. गोविंद वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच कार्याध्यक्ष - प्रा. दशरथ जाधव, विभागीय प्रतिनिधी -प्रा. केदार होगले, उपाध्यक्ष - प्रा. सुनिल शिंदे,प्रा. एच. के मांडके,प्रा. नितीन कदम,सहसचिव - प्रा. जे. बी गेजगे,प्रा. सुरेंद्र फाळके,प्रा.सुनिल पाटील कोषाध्यक्ष - प्रा. प्रमोद राऊत कायदे सल्लागार - प्रा. सौ. सुवर्णा कोळी महिला प्रतिनिधी - प्रा. सौ.निलम देशमुख, प्रा. सौ. पल्लवी भोसले,प्रा. सौ. माधुरी चव्हाण, प्रा. सौ. पूनम कदम प्रा. सौ. ज्योती पाटील, प्रा. सौ. स्वाती जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेचे नेते प्रा. दत्तात्रय धर्मे, प्रा.पी. एस गायकवाड, प्रा. माधवराव गुरव,प्रा. गणेश कोरे, प्रा.बी. बी पाटील, यांनी नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून सदस्यांचे अभिनंदन केले.
सेवेत कायम असलेल्या शिक्षकांच्या प्रश्नाबरोबरच जिल्यातील विविध महाविद्यालयात तासिका तत्वावर, अर्धवेळ, विनाअनुदानित, टप्पा अनुदानित, व्यपगत पदावर तसेच पेन्शन योजनेचा लाभ नसलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.-डॉ. विलास खंडाईत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.





Social Plugin