श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथे एन. एन. एम. एस./सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी सत्कार
बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत. ध्येय मोठे असावे.कर्तव्यात कसूर करू नये. ध्येय प्राप्तीकरता प्रयत्नाची गरज असते. इच्छेला ध्येयाचे स्वरूप दिल्यास आयुष्य यशस्वी बनते.असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव यांनी आपल्या मनोगतात मांडले .
श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथील एन. एम. एम. एस. व सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते.संस्था उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव तसेच सचिव श्री मोहनराव जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमास संस्था विश्वस्त श्री विश्वनाथराव जाधव, श्री योगेशराव देशमुख, श्री एस. आर. पाटील, प्राचार्य डी.एन. गोफणे,पर्यवेक्षक आर्. एन. जाधव,शिक्षक,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री चंद्रकांत शिंदे यांनी पालक मनोगत व्यक्त केले.शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे एन.एम.एम. एस. (शिष्यवृत्तीधारक )कुमारी समृद्धी संतोष देशमुख, कुमारी स्वराली निलेश शेटे, कुमारी तनिष्का किरण आलेकरी, (सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी )कुमारी वैष्णवी विठ्ठल पोतेकर, कुमारी राजवर्धनी सुरेंद्रकुमार जाधव, कुमारी श्रद्धा अजय नलवडे, कुमारी दिव्या राहुल देशमुख, कुमारी अंकिता चंद्रकांत नलावडे, कार्तिक अमोल शिंदे, कुमारी पद्मजा सूर्यकांत शिंदे, साईराज मनोज चव्हाण,रुद्र श्रीमंत लावंड,कुमारी स्वरा विनोद क्षीरसागर,प्रज्वल अजय जगदाळे, सर्वेश उमेश घाडगे, कुमारी जानवी बाळकृष्ण चव्हाण,यशराज रवींद्र भोसले, कुमारी पूर्वा लक्ष्मण यादव, धैर्यशील निलेश सावंत,कुमारी श्रावणी सचिन वाघ, कुमारी श्रावणी अशोक शिंदे,वेदांत हनुमंत शिंदे.
यावेळी मार्गदर्शक शिक्षक श्री पाकले ए. एस., सौ जाधव एस. एस., श्री गायकवाड ए. एम.,सौ गुरव जे.डी. यांचा सत्कार करण्यात आला.श्री आर. एन. जाधव यांनी आभार मानलेश्री मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले.





Social Plugin