Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावमध्ये रविवारपासून हरिनाम सप्ताह



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव  येथील श्री सेवागिरी महाराज मंदिरात रविवार (ता. २०) ते २७ एप्रिलअखेर अखंड हरिनाम सप्ताह व हीरकमहोत्सवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे ६० वे वर्ष आहे.

सप्ताहात रोज पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी आठ ते अकरा व दुपारी तीन ते पाच श्री ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, सायंकाळी सात ते नऊ कीर्तन, रात्री नऊ वाजता भोजन व रात्री अकरा ते पहाटे चार जागर अशा दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २६) दुपारी चार वाजता दिंडी सोहळा होईल.

दरम्यान, परभणीचे प्रकाश महाराज साखरे, भिवंडीचे जगन्नाथ महाराज पाटील, पुण्याचे कबीर महाराज आतार, परळीचे तुकाराम महाराज मुंढे, अकलूज येथील सुरेश महाराज सुळ, लातूरचे देविदास महाराज निवळीकर, मालेगावचे मधुकर महाराज शेलार यांची व आळंदीचे पंढरीनाथ महाराज आरू यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तगणांच्या सहकार्याने या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तरी समस्त वारकरी, भाविक भक्तगणांनी या ज्ञानदान सोहळ्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी केली आहे.